Saturday, March 19, 2011

झम्पी................

एक व्हती झम्पी लई मस्ती करायची
दिवस उगवला की गावभर हिंडायची
लोंकांची भांडण सतत आणायची
दिवसभर हिंडून घराकडं निघायची
आईन विचारलं की म्या काही नाई केलं म्हणायची
आईन मारलं की लई मुळूमुळू रडायची
रडत रडत कोपरयात रुसून बसायची
बापान लाड केला की खुद्कून हसायची................



















           प्रिती रोकडे ...........

Wednesday, March 2, 2011

फक्त तुझ्या साठी.................

तुझ्या हृदयात मला थोडीशी जागा दे
जास्त का होईना पण थोडासा आश्रय दे 

त्या गडगडणार्या मेघांच्या आवाजने  
तुझ्या घट्ट मिठीत मला आधार दे
तुझ्या त्या भारावून टाकणाऱ्या नयनांना
माझ्या नयनात हरवून दे
तुझ्या गोडगुलाबी ओठांनी माझ्या
नाजूक ओठांना स्पर्श दे
तुझा हात माझ्या हातांशी जुळवून घे
माझे मन तुझ्या मनाशी मिळवून घे
तुझ्या नावशी माझ्या नावाला अर्थ दे
प्रेम करते तुझ्यावर एक हे माझे 
म्हणणे तू जरा अवश्य समजून घे ............



















प्रिती रोकडे ...........................

तू तिथं मी..........

तू तिथं मी..,
तू जिथे जिथे जाशील
तिथे तिथे तुझ्या पाउलखुणा असतील
त्याच पाउलखुणाना मी माझ्या म्हणून समजील..














प्रिती रोकडे .......

Sunday, February 20, 2011

My Passion.........


फूल हे नेहमी फूलच असते                                 
त्याला कशाशीच उपमा नसते,

तसेच आई ही आईच असते
तिला ही कुणाची टक्कर नसते,
जसे गुलाबाच्या फूलाला खूप महत्व असते
तसे आईच्या मायेला खूप मोल असते ..............





         








प्रिती रोकडे ..................                                                                                                       

काही नको मला फक्त तुझी साथ हवी ...

काही नको मला फक्त तुझी साथ हवी
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी

केलेस प्रेम माझ्यावर तर ते प्रेम
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी    

सोडून जाऊ नकोस मला कधी
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी

जरी मी कधी सोडून गेले तुला
तर सहन करण्याची तुझी तयारी हवी

कधी सुखात तरी कधी दुखात
तुझ्या आधाराची गरज हवी



प्रिती रोकडे




Wednesday, February 16, 2011

असेच सुचले म्हणून कधी कधी मला ही वाटते,..

असेच सुचले म्हणून कधी कधी मला ही वाटते,..
 
कधी कधी मला ही वाटते 
या स्वप्नांच्या जगात जगावे
स्वप्नांच्या जगात जगून परी बनून उडावे,
 
 










कधी रंगीत फुलपाखरू बनून
या फुला वरून त्या फुलावर बागडावे,


 









तर कधी पक्ष्यासारखे आकाशात
उंच भरारी घेऊन उडावे,

 







कधी मोरा सारखे पिसारा फुलवून 
त्या मोरासारखे नाचावेसे  वाटते,

 







कधी पावसाप्रमाणे ढगातून थेट
जमिनीवर बर्सावेसे वाटते,

 









तर कधी नदी सारखे एका
ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी नेहमी
झुळ झुळ संथ वाहावसे वाटते ,

 





कधी मंद झुळूक वाऱ्याप्रमाणे
कुणा ला तरी स्पर्श करावेसे वाटते,

 







कधी कधी असे वाटते की लहान बाळासारखे
होऊन आईच्या कुशीत जाऊन जोपावेसे वाटते



 








                                                                          प्रिती रोकडे ......................

Saturday, February 5, 2011

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं.
या मरणानं मला दोनदा निराधार केलं.
मी त्याचं सूड घेईन! मी जिंकेन मरणाला !
मला कैवल्यवाणी येते .....
निरामयीन पोथी समोर धरली आणि हात जोडले.
तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.
कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाडयावर!
वाडा गदागदा हलला. क्षणमात्र आणि दुसरयाच क्षणी त्याचं छप्पर ढासळल!
बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले.
निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजून सुटली
आणि खाली येऊ लागली.
भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली.
त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही.
वरून खाली येणाऱ्या मृत्युकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली.
तिनं मृत्यूला डिवचल  होतं .
ती पोथी वाचायची असा निश्शय करून!
म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता..

 

                                          पुस्तक - मृत्युंजयी !!!!
                                       लेखक - रत्नाकर मतकरी......

Friday, February 4, 2011

का कुणास ठाऊक आज असं का वाटतंय
कुणीतरी माझी सारखी राहून राहून आठवण काढतंय
आठवण काढून माझी,
त्याची मला आठवण करून देतंय
त्याच्या या आठवणीन माझा मन फार झुरतय
काही क्षणातच डोळ्यांमधून असं पाणी का वाहतंय ???????????
















प्रिती रोकडे ....


Sunday, January 30, 2011

सांगा ना सख्या तू असं का केलसं..................

सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं
प्रेमाच्या रंगात रंगताना रंग असे उधळून का गेलास,
तुझं नाव मला माझ्या नावाशी जोडायचं होतं
तेच नाव घेऊन मला या जगात वावरायचं होतं,
रोज आठवण करत होते तुझी
तू माझी अशी आठवण न करता कसा काय राहिलास,
हात हातात घेऊन तुझा मला या वाटेवर चालायचं होतं
पण आज तोच हात सोडून एकटाच कसा काय गेलास,
प्रेमाचे दोन अबोल शब्द तुझे  मला ऐकायचे होते आणि
तेच शब्द ऐकायला माझे कान आतुरतेने वाट पाहत होते,
सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं ............................


priti rokade........................




Saturday, January 29, 2011

कारण  मलाच काही कळत नाही......................



हट्टीपणा आहे माझ्या अंगात तर
समजूतदार पणाची काय बातच नाही
कारण  मलाच काही कळत नाही,

मित्र -मैत्रिणी खूप आहेत माझे 
समजून मला कोणी घेतच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले 
त्यानी मला कधीच समजून घेतलंच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

विश्वास ठेवते ज्यांच्यावर
तेच माझा विश्वास घात करतात 
का कारण मलाच काही कळत नाही,

मीपणाने वागते मी आणि
तोच मी पणा माझ्याच अंगी भवतो मला
कारण मलाच काही कळत नाही,

कोणी तरी रागवले म्हणून
मुळूमुळू रडणे आणि,
कोणी तरी जोक केला म्हणून 
खिदीखिदी हसणे एवढेच येते मला

कारण मलाच काही काळात नाही,


चांगले काय आणि वाईट काय
यातील फरक माहितच नाही
म्हणून तर म्हणते मी
कारण मलाच काही कळत नाही
कारण मलाच काही काळात नाही ..........................................................



प्रिती रोकडे ..................