Saturday, March 19, 2011

झम्पी................

एक व्हती झम्पी लई मस्ती करायची
दिवस उगवला की गावभर हिंडायची
लोंकांची भांडण सतत आणायची
दिवसभर हिंडून घराकडं निघायची
आईन विचारलं की म्या काही नाई केलं म्हणायची
आईन मारलं की लई मुळूमुळू रडायची
रडत रडत कोपरयात रुसून बसायची
बापान लाड केला की खुद्कून हसायची................           प्रिती रोकडे ...........

Wednesday, March 2, 2011

फक्त तुझ्या साठी.................

तुझ्या हृदयात मला थोडीशी जागा दे
जास्त का होईना पण थोडासा आश्रय दे 

त्या गडगडणार्या मेघांच्या आवाजने  
तुझ्या घट्ट मिठीत मला आधार दे
तुझ्या त्या भारावून टाकणाऱ्या नयनांना
माझ्या नयनात हरवून दे
तुझ्या गोडगुलाबी ओठांनी माझ्या
नाजूक ओठांना स्पर्श दे
तुझा हात माझ्या हातांशी जुळवून घे
माझे मन तुझ्या मनाशी मिळवून घे
तुझ्या नावशी माझ्या नावाला अर्थ दे
प्रेम करते तुझ्यावर एक हे माझे 
म्हणणे तू जरा अवश्य समजून घे ............प्रिती रोकडे ...........................

तू तिथं मी..........

तू तिथं मी..,
तू जिथे जिथे जाशील
तिथे तिथे तुझ्या पाउलखुणा असतील
त्याच पाउलखुणाना मी माझ्या म्हणून समजील..


प्रिती रोकडे .......

Sunday, February 20, 2011

My Passion.........


फूल हे नेहमी फूलच असते                                 
त्याला कशाशीच उपमा नसते,

तसेच आई ही आईच असते
तिला ही कुणाची टक्कर नसते,
जसे गुलाबाच्या फूलाला खूप महत्व असते
तसे आईच्या मायेला खूप मोल असते ..............

         
प्रिती रोकडे ..................                                                                                                       

काही नको मला फक्त तुझी साथ हवी ...

काही नको मला फक्त तुझी साथ हवी
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी

केलेस प्रेम माझ्यावर तर ते प्रेम
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी    

सोडून जाऊ नकोस मला कधी
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी

जरी मी कधी सोडून गेले तुला
तर सहन करण्याची तुझी तयारी हवी

कधी सुखात तरी कधी दुखात
तुझ्या आधाराची गरज हवीप्रिती रोकडे